…तर ठाकरे सरकारविरूद्धही आंदोलन करा, जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Jitendra Awhad - Uddhav Thackeray

मुंबई :- केंद्र सरकारवर आपला जोरदार हल्ला झाला पाहिजे, त्याचबरोबर राज्यात आपली सत्ता असली तरी राज्य सरकारचे काही निर्णय चुकत असतील तरीसुद्धा आपण आंदोलन केले पाहिजे, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळाव्यादरम्यान मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला, यावेळी आव्हाड बोलत होते.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यामुळेच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. इतकी वर्ष चौकशी लागली नाही आणि आता अचानक कशी काय लागली? याचा अर्थ सहाजिक आहे की, यामागे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश हे एकच कारण आहे, असेही आव्हाड म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER