आरे आंदोलकांवरील गुन्हे १० दिवसांत मागे घेणार- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई : आरेमधील मेट्रो-३ साठी (Metro-3) झाडे कापण्यास सुरुवात केली. यास येथील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. मात्र यावेळी २९ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे पुढच्या १० दिवसांत मागे घेतले जातील, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिले आहे.

आरे संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाने जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. या भेटीनंतर समितीचे रोहित जोशी (Rohit Joshi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंदोलकांमध्ये अनेक जण विद्यार्थी, गृहिणी, आदिवासी समाजातील कार्यकर्ते आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER