गणेश नाईकांना राष्ट्रवादीत योग्य मान मिळायचा, आता भाजपात…, जितेन्द्र आव्हाडांचा टोला

Jitendra Awhad

नवी मुंबई : पूर्वी राष्ट्रवादीत असताना गणेश नाईक यांना राजकारणात मानाचे स्थान होते. मात्र, आता भाजपमध्ये त्यांना बसायला साधी खुर्चीही मिळत नाही. भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना साधी बसायलाही खुर्ची देण्यात आली नव्हती, असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपचे गणेश नाईक याना लगावला. शरद पवारांचा (Sharad Pawar) गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर मोठा विश्वास होता. पण नाईक यांनी त्यांचा विश्वासघात केला. बाळासाहेब ठाकरे यांचाही त्यांनी अशाचप्रकारे धोका दिला होता, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ते रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी गणेश नाईक आणि भाजपवर टीकास्त्र सोडले.

आव्हाड म्हणाले, काही वर्षांपूर्वी मोदी आणि अमित शाह नेपाळमार्गे युरोपला पळून जातील, असे गणेश नाईक म्हणायचे. पण हेच तिकडे पळाले. भाजपमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात कुस्ती आहे. मंदा म्हात्रे या आपल्याच आहेत. गणेश नाईक आपल्यातून गेले. पण बहीण आपलीच आहे, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले.

या भाजपने सर्वांना धंद्याला लावले आहे. त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडले नाही. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मग आपले शेतकरी माल विकण्यासाठी कुठे जातील? ज्या सहकार चळवळीने महाराष्ट्राला मोठे केले त्याच सहकार क्षेत्रात भाजपने घोळ केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER