अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नव्हे; जितेंद्र आव्हाड यांची टीका

Jitendra Awhad-Amit Shah

मुंबई :- भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ठाकरे सरकारबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेनेने आमच्यासोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्रपक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं शहा म्हणाले. शहा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीकास्त्र सोडले आहे.

महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अपवित्र युती म्हणणारे अमित शहा म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, असे आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्यामुळे आम्हाला अपवित्र ठरवले जात असेल तर आम्हाला ते चालेल.’ असा टोला आव्हाड यांनी लगावला.

आपण बोलण्यापेक्षा महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा जो जबरदस्तीने कमी केला आहे तो जरा व्यवस्थित करा. तसेच महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्याबाबत जे राजकारण केले गेले आहे ते जरा बंद करा. कमी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातला व्हेंटिलेटर दिले. आम्हाला दुपटीने देऊ नका. मात्र गरज आहे तेवढी तरी द्या. तेव्हा महाराष्ट्राचा गळा दाबण्याचे काम करून महाविकास आघाडीला अपवित्र म्हणण्यापेक्षा इथली माणसे मारणार नाहीत, याची काळजी घ्या, असे आव्हाड म्हणाले.

ही बातमी पण वाचा : अमित शहांचे मोठे विधान: महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ सरकार स्वतः कोसळणार, राष्ट्रवादीसोबत युतीचेही संकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button