जितेंद्र आव्हाडांना भाजपाचे चार प्रश्न

bhandari-awhad

मुंबई : महाविकास आघाडीचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कालपासून वादाच्या भोव-यात अडकले आहेत. एका सिव्हील इंजिनीअर तरुणाला आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी मारल्याचा आरोप आव्हाडांवर खुद्द या तरुणाने
केला आहे. त्यामुळे कालपासून सर्वत्र आव्हाडांचा लेखाजोखा मांडणा-या पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या फिरत आहेत.

असे असतानाही जितेंद्र आव्हाड यांनी त्या तरुणाला मारल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यातच आता महाराष्ट्र भाजपानेही मंत्री, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

भाजपाने आव्हाडांना विचारलेले प्रश्न :

१. ‘तरुणाच्या घरी जे गणवेशधारी पोलीस गेले होते ते त्या तरुणाला खोटं बोलून मंत्री महोदयांच्या खासगी बंगल्यावर का घेऊन गेले?

२. तरुणाच्या म्हणण्यानुसार बंगल्यावर १० ते १५ इसम पूर्वीच उपस्थित होते. म्हणजे कोरोना लॉकडाऊनचे नियम स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या आशीर्वादानं धाब्यावर बसवले जात आहेत का?

३. पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना मारहाण होत असेल तर महाराष्ट्राच्या गुंडगिरीला शासन-प्रशासन अभय देत आहे का?

४. त्या तरुणाने मंत्रिमहोदयाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच; पण त्याची वाट न बघता गृहनिर्माणमंत्र्यांचे समर्थक म्हणवणाऱ्यांनी कायदा हातात घेणे सोयीचे समजले. याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा व समर्थकांचा महाराष्ट्राच्या गृह खात्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? अशा प्रश्नांची उत्तरं भाजपानं जितेंद्र आव्हाड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागितली आहेत. महाराष्ट्र भाजपाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून हे प्रश्न आव्हाडांना विचारले आहेत.

महाराष्ट्र भाजपाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून हे प्रश्न आव्हाडांना विचारले आहेत.

आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा- फडणवीसांची मागणी