‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे !’ शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तसेच शिवसेनेचे धडाडीचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) एकाच मंचावर पाहायला मिळाले. महाविकास आघाडी आणि वर्तकनगर पोलीस वसाहतीमुळे दोन जुने राजकारणी मित्र एकत्र आले होते.

“आम्ही दूर गेलो होतो, असे लोकांना वाटत होते, आम्ही जवळच होतो. नवरा-बायकोमध्येही वाद होत असतात. त्याच्यात काय मोठं. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे !” अशी मिस्कील प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“माझ्या पत्राची दखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस वसाहतीचा प्रश्न निकाली काढल्याने त्यांचे आभार. महाविकास आघाडीमध्ये किती वर्षांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आली.

त्यामुळे आम्ही एकत्र होतो, आहोत आणि भविष्यातही राहू. ” असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. दरम्यान वर्तकनगर पोलीस वसाहतीची  पुनर्वसन प्रक्रिया प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, तर गृहनिर्माणमंत्री यांच्या प्रयत्नाने होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER