रश्मी शुक्ला पाया पडत रडत म्हणाल्या होत्या, “मैं माफी मांगती हूँ”; जितेंद्र आव्हाडांचे दावे!

मुंबई :- वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून नवा वाद सुरू झाला आहे. रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमधून राज्यातल्या पोलीस बदली रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत गंभीर दावे केले आहेत. “रश्मी शुक्ला पाया पडत म्हणाल्या होत्या मै माफी मांगती हूँ, मेरा लेटर वापस दे दो”, असा दावा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची शिकवण विसरलं, असे म्हटले आहे. सरकारकडून आपण खूप मोठ्या ह्रदयाचे आहोत, हे दाखवण्याची चूक झाली. शिवाजी महाराजांचे तत्व होते , ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले होते , असे ते म्हणाले.

सगळ्या चुका करून जर रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या. माझे पती नुकतेच वारले आहेत असं म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आले नाही, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘या’ आमदाराला रश्मी शुक्लांनी धमकावलं : जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER