‘आई-वडिलांनी जन्म दिला पण ओळख पवार साहेबांनी दिली’

Jitendra Awhad And Sharad Pawar

ठाणे : गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतचे ऋणानुबंध महाराष्ट्र जाणतो. आव्हाड यांनी त्यांच्या जीवनात शरद पवार यांना नेहमीच सर्वश्रेष्ठ मानलं आहे. संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते त्यांच्याप्रती व्यक्त होत असतात.

महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आव्हाडांना साथ द्या, शरद पवारांचे आवाहन

ठाण्यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आव्हाड यांनी पवारांप्रती व्यक्त होण्याची संधी सोडली नाही. आई वडिलांनी जन्म दिला पण ओळख मला शरद पवारांमुळे मिळाली असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत, तसंच कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित होते. शरद पवार यांनीही जितेंद्र आव्हाड यांचे कौतूक केले. महाराष्ट्राला कर्तुत्ववान मंत्री मिळाला असल्याचं सांगितलं. जिथे कर्तुत्व असतं, कर्तुत्वाला प्रोत्साहन कऱण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्न सोडवणारं नेतृत्व उभं राहू शकत असून हेच आव्हाडांनी महाराष्ट्राला दाखवून दिल्याचं पवार म्हणाले.