शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं आव्हाडांकडून आधी अप्रत्यक्ष समर्थन, नंतर माघार

Jitendra Awhad-Balasaheb Thackeray

मुंबई : व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याबद्दल माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी (shivsainik) मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले. आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडूनही शिवसैनिकांनी पाठराखण होताना दिसत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा जुना व्हिडीओ शेअर करत आव्हाडांनीही अप्रत्यक्ष समर्थन केले होते. मात्र काही वेळातच त्यांनी केलेले ट्विट हटवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)या प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे.

‘काळाची गरज’ असे कॅप्शन देत जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. आव्हाड यांनी थेट उल्लेख केलेला नसला, तरी मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याबद्दल निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीची घटना ताजी असल्याने याचा संदर्भ जोडला जात आहे. मात्र काही वेळातच त्यांनी केलेले ट्विट हटवले.

व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले…

साहजिक आहे… कारण नसताना तुमच्या कोणी कानफटात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल, वा छान, मस्त बसली, आणखी जोरात मारायला पाहिजे होती… इतका बुळचटपणा बरा नव्हे. त्याचा फटकन आवाज आल्यानंतर आपला काडकन आवाज आला पाहिजे. तो शिवसैनिक… नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नकोत, कानफटात मारण्यासाठी तयार ठेवा, असे बाळासाहेब या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया, संजय राऊतांचे अप्रत्यक्ष समर्थन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER