कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय

Jitendra Awhad

ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महत्त्वाचं आवाहन केलं आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) हे सण साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला केले आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदा कोरोनामुळे सर्वच सण साजरे करण्यावर मर्यादा येत असल्याने डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करून माहिती दिली. पुढील काही दिवसांमध्ये सर्वांना नवरात्रीचे वेध लागतील. आपण मतदारसंघात गेली १० वर्षे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतो. दांडीया-गरबाही खेळला जातो. मात्र, यंदा तेथील नागरिकांनीच गरब्याचे आयोजन करु नका, अशी विनंती केली आहे. तसेच, देवीची प्रतिष्ठापणाही कोणाच्या तरी घरी करण्यात यावी, असेही नागरिकांनी सुचविले आहे. या सुजाण नागरिकांच्या विनंतीचा मान ठेऊन यावेळी सार्वजनिक नवरात्रोत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER