माझी हत्या करण्याचे ठरले… असो, आईचा आशीर्वाद, पोलीस कारवाई करतील; आव्हाडांनी व्यक्त केले दुःख

Jitendra Awhad Tweet

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी ठाण्यातील एका अभियंत्याला त्यांच्यासमोरच मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड सध्या चर्चेत आले आहेत. ‘जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिल्याने त्यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन मला मारहाण केली.’ असा आरोप संबंधित अभियंता अनंत करमुसे याने केला आहे. या प्रकरणी करमुसे याने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

घडलेल्या या प्रकारानंतर महाराष्ट्रातील राजकारणानेही वेग पकडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर भाजपच्याच इतर नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं दु:ख जाहीरपणे मांडलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं असून त्यांना सोशल मीडियावर देण्यात येत असलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तसंच आपल्या भावनाही मांडल्या आहेत. ‘हे मी पाच वर्षे भोगले…घराची रेकी झाली…कुणी केली… हत्या करण्याचे ठरले…कोण होते त्यात…असो…आईचे आशीर्वाद…पोलीस कारवाई करतील यावर.’ असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


Web Title : Jitendra awhad emotional tweet after controversy

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)