प्लाझ्मा दान करून आव्हाड यांनी साजरा केला वाढदिवस

JItendra Awhad & Palsma

ठाणे :- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा आज वाढदिवस. मात्र कोरोनाच्या (Corona) संकटकाळात वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणारा प्लाझ्मा (Plasma) दान केला.

काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या आव्हाडांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जणू कोरोनाग्रस्तांसाठी जीवनदानाचा संकल्प सोडला. ठाण्यातील ‘ब्लड लाईन’ रक्तपेढीमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मादान केले. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले. परांजपे यांनीही काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच व्यक्तींनी प्लाझ्मादान करावे, जेणेकरून इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन यावेळी आव्हाड यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे (Thane) शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्स  लावू नये, त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप असे उपक्रम राबवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER