
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात मुंबई-पुणेमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातच मुख्यमंत्री मुंबईकर तर उपमुख्यमंत्री बारामतीकर असले तरी पुण्याचे पालकमंत्री आहेत. अशा स्थितीत या दोन शहरांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहून विरोधी भाजपाने सरकारच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवून हे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरल्याचे म्हटले आहे. करिता भाजपाने काल ‘माझे अंगण माझे रणांगण’ असा नारा देत महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.
ही बातमी पण वाचा :- लज्जास्पद!; सत्तेची लालसा नेत्यांना काय काय करायला भाग पाडते – आदित्य ठाकरे
काळे झेंडे, काळ्या फिती, काळ्या रंगाचेच मास्क घालून भाजपा नेत्यांनी आंदोलन केले. भाजपाच्या या आंदोलनाची अनेक स्तरांतून टीका झाली. त्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. आंदोलनातून भाजपानं दुहीची बीजं पेरली, जनता माफ करणार नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली. “संकटात सापडलेल्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी एकी महत्त्वाची आहे. असं असताना महाराष्ट्रद्रोही भाजपानं आंदोलन करून दुहीची बीजं पेरली.
जनता हे कधी विसरणार नाही आणि माफही करणार नाही. ” असं म्हणत आव्हाड यांनी भाजपावर टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरवरून आपलं मत व्यक्त केलं. तसंच यापुढे त्यांनी ‘सत्तेचा हव्यास’ असा हॅशटॅगही वापरला आहे.
संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्या साठी एकी महत्वाची असताना #महाराष्ट्रद्रोहीBJP ने आंदोलन करून दुही ची बीजे पेरली
जनता हे विसरणार नाही आणि माफ ही करणार नाही#सत्तेचा_हव्यास— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 23, 2020
केंद्राप्रमाणे राज्यानेही बारा बलुतेदारांसाठी पॅकेज घोषित करावे, अशी मागणी भाजपाने सत्ताधारी ठाकरे सरकारकडे केली आहे. तसेच, कोरोनाच्या स्थितीवर महाविकास आघाडी सरकार नियंत्रण मिळवण्यात असमर्थ असल्याचे भाजपाने आंदोलनाच्या मार्गातूनही सांगितले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला