मोदी सरकारने मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी लोकल ट्रेन सुरू कराव्यात: जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad-pm Modi

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली . यापार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाले आहे . यापार्श्वभूमीवर मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा:- ‘नमस्ते ट्रम्प’साठी आले होते, तेव्हा कानावर पडले असावे  -जितेंद्र आव्हाडांची टीका 

रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किंवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाहीत, त्यामुळे रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यांच्यासाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या”, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. ट्विटरद्वारे आव्हाड यांनी ही मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER