फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचे जितेंद्र आव्हाडांकडून कौतुक

Jitendra Awhad - Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात करोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ठाकरे’ सरकारने आज रात्री ८ वाजेपासून काही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ८ वाजेपासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असेल आणि शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. तर, ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे जाहीर केले.

कोरोनाची भयावह परिस्थिती पाहून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनीही सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कौतुक केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत केलं. शिवाय कोरोनाचं संकट वाढतंय… एकमेकास साहाय्य करू असंही आव्हाड म्हणाले. ‘प्रशंसनीय भूमिका… कोरोनाचं संकट वाढत आहे, एकमेकास साहाय्य करू या’ असं ट्विट करत आव्हाड यांनी फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button