राजे यातना होतात हे बघून … – जितेंद्र आव्हाड

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप काल 19 सप्टेंबर रोजी नाशिक येथे झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या महाजनादेश यात्रेचं पुण्य थोडं आपल्यालाही मिळावं म्हणून आजच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहील्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगीतले. तसेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री, महाराष्ट्राला स्थिर सरकार देणारे मुख्यमंत्री अशा शब्दांत मोदींनी मुख्यमंत्र्यांचे भरभरून कौतूकही केले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस कसे योग्य आहे याची अनेक उदाहरणं मोदींनी यावेळी दिली. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप अतिशय गोड झाला. मात्रा या गोडातही मिठाचा खडा पडावा अशी एक चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. त्या चर्चेचे मुख्य आहेत नुकतेच भाजपत सहभागी झालेले छत्रपती उदयनराजे भोंसले.

महाजनादेश समारोपीय कार्यक्रमात उदयनराजेही मंचावर होते. त्यांनी मराठी पगडी पंतप्रधान मोदींच्या डोक्यात घालून त्यांचे स्वागत केले. मोदींनीही आपल्य़ा भाषणात छत्रपतींचे तेरावे वंशज उदयनराजेेंसाठी गौरवोद्गार काढले. तसेच ही पगडी म्हणजे माझा सर्वोच्च सन्मान असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. परंतू, या सभेत उदयनराजेंच्या बाबतीत खटकणारी एक गोष्ट नेटक-यांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हेरली. खासदार उदयनराजे यांचा या सभेतील एक फोटो चांगलाच व्हारल झाला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सन्मान होताना दिसतोय. त्यांना हार घातला जातोय, तर दुसरीकडे उदयनराजे मागे उभं असल्याचं दिसतंय.याच फोटोचा धागा पकडून उदयनराजेंचा अपमान झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत. राष्ट्रवादीत असताना त्यांचा कसा सन्मान केला जायचा याचा एक फोटो देखील यासोबत व्हायरल केला जात आहे.

हाच धागा पकडून राजे यातना होतात हे बघून …..
5000 मनसबदारी वर लाथ मारली होती आमच्या धन्यांनी … राजे … अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट केले आहे.