‘काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत’ – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई : राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकार नियंत्रणात आणू शकले नाही, असा आरोप केला होता. त्यानंतर सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरल्याचं म्हणत भाजपानं राज्यभरात सरकारविरोधात आंदोलनही केलं होती. दरम्यान, काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

“मुंबईचे मॉडेल देशभर राबवा. हे देशासमोरील सर्वोत्तम उदाहरण आहे, असं नीति आयोगानं आणि आयसीएमआरनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही बिकट आहे, असं गुजरात न्यायालयानं म्हटलं आहे. तरी काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,” असं म्हणत आव्हाड यांनी विरोधकांना लक्ष केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER