पबजी कॉर्पोरेशनची जिओशी डिजिटल भागीदारी

सेवांचा घेता येणार लाभ

Jio Digital Partnership of PUBG Corporation

मुंबई :- प्लेअर अननोन्स बॅटलग्राउंड (पबजी) हा अतिशय लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. या गेमची भारतात बिटा सर्व्हिस सुरू होणार आहे. हे पबजी लाइट व्हर्जन असेल. हा गेम मोफत असेल आणि लोअर-एंड संगणकावरही ती खेळता येईल. यात गेमप्ले वाढविण्यात आला असून, गेमिंगचा अनुभव आणखी सर्वंकष आणि व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नव्या गेमच्या व्हर्जनमध्ये ग्राहकांना अधिक चांगला आणि जास्तीत जास्त गुंतवून ठेवणारा अनुभव मिळवून देण्यासाठी पबजी लाइटने रिलायन्स जिओशी भागीदारी केली आहे. भारतातील ही विशेष भागीदारी आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय असलेले दोन ब्रँड ग्राहकांना ग्राहकांना नव्या युगातील डिजिटल अनुभव देण्यासाठी एकत्र आले आहेत.
पबजी लाइटसाठी नोंदणी करणारे जिओ ग्राहक पबजी फ्री स्कीन्स आणि इतर विशेष रिवार्ड्स मिळवू शकतील.

यासाठी जिओ ग्राहकांनी https://gamesarena.jio.com या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि दोन टप्प्यांत असलेला नोंदणी अर्ज भरावा. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर व्हेरीफिकेशन लिंक येईल. व्हेरीफिकेशन पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला ई-मेलवर रिडेम्प्शन कोड येईल आणि तो गेममध्ये वापरता येईल. पबजी लाइट डाऊनलोड करुन नोंदणी केल्यानंतर मेन्यूमध्ये जा. मेन्यूमध्ये अॅड बोनस/गिफ्ट कोड यावर क्लिक करा. आता मोकळ्या जागेत रिडेम्प्शन कोड अॅड करुन रिडीमवर क्लिक करा. अशाप्रकारे या सेवेचा लाभ घेता येईल.