चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही जिमी शेरगिलची लव्ह स्टोरी

जिमी शेरगिल (Jimmy Shergill) हा एक असा कलाकार आहे जो त्याच्या मूडनुसार चित्रपट करतो. जो दिग्दर्शक त्याच्या जवळचा आहे त्याच दिग्दर्शकासोबत काम करण्यास तो प्राधान्य देतो. अलीकडे जिमी शेरगिलने त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला आहे. जिमी शेरगिलच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बर्‍याच चर्चा सार्वजनिक आहेत; पण त्याचे वैयक्तिक आयुष्य कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. जिमी शेरगिलच्या वैयक्तिक जीवनासंबंधीचा एक खुलासा असा आहे की, त्याची पत्नी प्रियंकाने सूड घेण्याच्या प्रक्रियेत त्याच्याशी लग्न केले होते. अशा प्रकारचे आणखी खुलासे जाणून घेण्यासाठी जिमीच्या सुरुवातीच्या प्रवासावर एक नजर टाकूया.

जिमी शेरगिल गोरखपूरच्या जाट कुटुंबातील असून त्याचा जन्म ३ डिसेंबर १९७० रोजी झाला. जिमीने प्रारंभिक शिक्षण लखनौच्या सेंट फ्रान्सिस कॉलेजमध्ये केले. यानंतर १९८५ मध्ये जिमी पंजाबमधील आपल्या वडिलोपार्जित गावी परत आला आणि तेथे त्याने उर्वरित शिक्षण केले. शिक्षण संपल्यानंतर जिमीने आपल्या भावाच्या सांगण्यावरून चित्रपटसृष्टीत नशीब आजमावले आणि मुंबईत राहायला गेला. मुंबईत आल्यानंतर जिमीने रोशन तनेजाच्या अभिनय वर्गात (Acting Class) भाग घेतला.

जिमीने १९९६ मध्ये आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘माचीस’ होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक गुलजारसाहेब होते. जिमीचा हा चित्रपट पंजाबमधील दहशतवादावर आधारित होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. या चित्रपटामुळे आदित्य चोप्राचा चित्रपट ‘मोहब्बतें’ त्याला मिळाला ज्यामध्ये त्याने अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय या मोठ्या कलाकारांसोबत काम केले. जिमीने ‘ए वेडनेस्डे’ चित्रपटासाठी साहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जिंकला. जिमीने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत ‘मेरे यार की शादी है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘हासिल’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुना भाई’, ‘ए वेडनेस्डे’, ‘माय नेम इज खान’, ‘तनु वेड्स मनु’, ‘साहेब, बीवी और गँगस्टर’, ‘स्पेशल २६’, ‘बुलेट राजा’, ‘फुगली’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’, ‘मदारी’ आणि ‘हॅपी फिर भागजाएगी’ सारख्या चित्रपटांतून नाव कमावले आहे.

जिमी शेरगिलची लव्ह स्टोरीही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. जिमी शेरगिलच्या पत्नीने एका मुलाखतीत खुलासा केला की, ‘मोहब्बतें’ची स्टोरी मला मनापासून आवडली; कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर मी वडिलांना सांगितले की, मी जिमीशी लग्न करेन. एका चुलतभावाच्या लग्नात जिमी आणि प्रियंकाची मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्यास खूप वेळ लागला. एका मुलाखती दरम्यान जिमीने उघड केले की, प्रियंका ही पहिली मुलगी आहे जिच्याशी त्याला प्रेम झाले. मला प्रियंका खूप प्रसन्न वाटली, माझ्या आधी कोणीही तिला इतके हसवले नव्हते. जिमीने सांगितले की, प्रियंकाला असे वाटले की, तो तिच्यावर हसत आहे, म्हणून सूड घेण्यासाठी माझ्याशी लग्न केले.

जिमी शेरगिलने बॉलिवूड तसेच पंजाबी चित्रपटांमध्ये काम करण्याचे मन तयार केले आणि तेथेही आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. २००५ मध्ये, जिमीने पंजाबी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, मनमोहनसिंगचा ‘यारा नाल बहांरा’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. जिमीचे बरेच चित्रपट हिट झाले असून बॉलिवूड तसेच पंजाबी चित्रपटसृष्टीतही त्याचे नाव आहे. याशिवाय जिमी शेरगिल पंजाबी चित्रपटांमध्ये दिग्दर्शनही करतो आणि दिग्दर्शक म्हणून बरीच प्रशंसाही मिळवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER