
हिंदी चित्रपटसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता जिमी शेरगिल (Jimmy Shergill) हा चित्रपटातील वेगळ्या अभिनय आणि व्यक्तिरेखा करिता ओळखला जातो. त्याने बर्याच चित्रपटांमध्ये कधीही न विसरणारे पात्र साकारले आहे. जिमी शेरगिलने आतापर्यंत बॉलिवूडमधील बर्याच सर्वोत्कृष्ट कलाकारांसोबत काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जिमी शेरगिल आपला वाढदिवस ३ डिसेंबर रोजी साजरा करतो. वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण त्याच्याशी संबंधित काहि खास गोष्टी जाणून घेऊ.
जिमी शेरगिलचा जन्म ३ डिसेंबर, १९७० रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्याने प्रारंभिक शिक्षण गोरखपूर येथून केले. यानंतर जिमी शेरगिलने उर्वरित शिक्षण लखनौ आणि पंजाबमधून पूर्ण केले. अभ्यास संपल्यानंतर त्याने सिनेमात जाण्याचा निर्णय घेतला. जिमी शेरगिलने १९९६ मध्ये माचीस या चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती.
माचीस या चित्रपटामधील जिमी शेरगिलची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर त्याने मोहब्बतें, दिल है तुमारा, हासिल, मुन्ना भाई एमबीबीएस, ए वेडनसडे, तनु वेड्स मनु, साहेब बीवी और गैंगस्टर सीरीज, स्पेशल 26 आणि मुक्काबाज यासह बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे आणि मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली आहे. हिंदी सिनेमाशिवाय जिमी शेरगिलनेही पंजाबी सिनेमात आपले अभिनय कौशल्य दाखविले आहे.
जिन्मी शेरगिलने मन्नत, धरती, आ गए मुंडे यूके दे, शारीक और दाना पानी यासह अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये जिमी शेरगिल कदाचित असा अभिनेता असेल ज्यास बहुतेक चित्रपटांमध्ये एकतर त्याला गर्लफ्रेंड मिळत नाही किंवा त्याची पत्नी फसवणूक करणारी निघते. तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स, दिल है तुमारा, मेरे यार की शादी है, हॅपी भाग जयगी आणि टॉम डिक एंड हॅरी असे अनेक चित्रपट आहेत ज्यात जिमी शेरगिलला त्याचे प्रेम लाभले नाही.
चित्रपटांशिवाय जिमी शेरगिलने वेब सिरीजमध्येही काम केले आहे. तो रंगबाज फिर से आणि यॉर ऑनर मध्ये दिसला आहे. जिमी शेरगिलच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगण्यात येते की २००१ मध्ये जिमीने त्याची गर्लफ्रेंड प्रियंका पुरीशी लग्न केले होते. लग्नाआधी दोघांनीही बर्याच दिवसांपर्यंत एकमेकांना डेट केले होते. जिमी शेरगिल आणि प्रियंका पुरी यांना वीर नावाचा मुलगा आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला