‘जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी’; संस्कृत सारिका पुस्तकात घोडचूक

Jiajabai

मुंबई :- इयत्ता ११ वी मध्ये अभ्यासक्रमात असलेल्या संस्कृत सारिका नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशावळ दाखवण्यात आली आहे. मात्र महाराजस्यया वंशावळीत शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा उल्लेख त्यांची पत्नी म्हणून दाखविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे संस्कृत विषयाचे पुस्तक अतिशय वादग्रस्त असून महाराजांची बदनामी करण्याच्या हेतून छापण्यात आल्याची टीका संभाजी ब्रिगेडने केली . दरम्यान हे पुस्तक त्वरित रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली .

संस्कृत सारिका हे लातूरच्या निकिता पब्लिकेशनचे पुस्तक असून राजेंद्र शास्त्री (गायकवाड) हे त्या पुस्तकाचे लेखक आहे. या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काण्यात आला. याप्रकरणी गंभीर पाऊले उचलत लेखक, वितरक, प्रकाशकव अभियानाचे प्रमुख यांच्यावर महापुरुषांची बदनामी प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडने केली आहे.

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०), मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.

संस्कृत सारिका हे पुस्तक इयत्ता ११ वी च्या विद्यार्थांना अभ्यासक्रमात आहे. माध्यमिक महाविद्यालयांच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दिली जाते. त्यांची बदनामी केली जाते. हा राज्याच्या शिक्षण विभागाचा निष्काळजीपणा आहे . हा राज्य सरकारचा भोंगळ कारभार आहे… हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचेही संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे .