इंदिरा गांधींशी पंगा घेऊन आणीबाणीच्या कायद्यातही बदल करायला लावणारा जिगरबाज संपादक !

Indira Gandhi - Maharastra Today

आधुनिक भारताच्या इतिहासाची पानं इंदिरांच्या आणीबाणीमुळं डागाळली. तब्बल २१ महिने नागरिकांकडून त्यांचे मुलभूत अधिकार हिरावले होते. वर्तमान पत्रांवर सेन्सॉरशीप लादली होती. सरकारविरोधी मजकूर पेपरात छापला जाऊ नये म्हणून अधिकारी स्वतः वर्तमान पत्र छपाईच्या आधी चाळायचे. सत्तेस अनुकुल मजकूर असेल तर तो छापायला परवानगी मिळयाची. अशा परिस्थीतीत सुद्धा काही असे पत्रकार होऊन गेले ज्यांनी राज्यसत्तेशी पंगा घेतला. त्यापैकीच एक होते कुलदीप नय्यर.

फाळणीनंतर भारतात आले

१४ ऑगस्ट १९२३ साली कुलदिप नय्यर यांचा जन्म आजच्या पाकिस्तानतल्या सियालकोटमध्ये झाला. त्यांच्या वाढत्या वयासोबत भारतीय स्वातंत्र लढा तीव्र होत गेला. तरुणपणाच्या दिवसांमध्ये त्यांचावर भगतसिंगचा प्रभाव होता. या परिणाम स्वरुप त्यांनी भगतसिंहांच आत्मचरित्र लिहलं. १९४२ साली त्यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागह घेतला. पुढं चालून देशाला स्वातंत्र्य मिळालं पण फाळणीत त्यांच्या कुटुंबानं सारं काही गमावलं.

भारतात आल्यानंतर त्यांनी उर्दू दैनिकांसाठी पत्रकारिता करायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी इंग्रज पत्रकारितेच्या दुनियेत पाऊल ठेवलं. पाहता पाहता इंग्रजी वर्तमान पत्रांच्या दुनियेत नय्यर यांनी मोठं नाव कमावलं. जवाहरलाल नेहरु आणि लालबहादू शास्त्री यांना नय्यर यांनी जवळून पाहिलं होतं. लालबहादूर शास्त्रींचे ते माध्यम सचिव होते. ताशकंदला शास्त्रींचा मृत्यू झाला तेव्हा ते जिवंत होते. इंदिरा आणि त्यांचे संबंधही चांगले होते.

इंदिरांनी एकदा केस कापल्यानंतर “मी कशी दिसते?” हे विचारलं होतं. तेव्हा उत्तर देताना नय्यर “खुप सुंदर” असं म्हणाले होते. पुढं कालचक्र असं फिरलं की याच इंदिरांनी नय्यर यांना तुरुंगात पाठवलं.

आणीबाणीच्या सेंसरशिप आणि कुलदिप नय्यर यांचा विरोध

अल्हाबाद उच्च न्यायालयानं निवडणूकीत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी इंदिरांना दोषी ठरवलं. तेव्हा इंदिरा पंतंप्रधान पदावर होत्या. उच्च न्यायालायानं इंदिरांना पदावरुन पाय उतार होण्याचे आदेश दिले. इंदिरांनी राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरु लागली. दिवसेंदिवस दबाव वाढतच चालला होता. याच क्रमात त्यांनी आणीबाणीची घोषणा केली. विरोधाच्या आवाजाला त्यांनी कायमच दाबून टाकलं. कुलदीप नय्यर तेव्हा ‘इंडीयन इक्सप्रेस’चे संपादक होते.

इंदिरांच्या आणीबाणीच्या घोषणेला नय्यर यांनी कडाडून विरोध केला. आणीबाणीला ते ‘जंगलराज’ म्हणायचे. एखादा पोलिस शिपाई सुद्धा न्यायाधीशाच्या तोऱ्यात आणीबाणीत वावरायचा, लोकांना शासन करायचा अशी मांडणी त्यांनी केली. २५ जून १९७५ साली त्यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. विविध राजकीय पक्षांनी इंदिरांचा विरोध केला. जनसंघ यात आघाडीवर होता. भारतीय कम्यूनिस्ट पार्टी आणीबाणीच्या समर्थात होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा विरोध होता पण ते लोक ठळकपणे समोर येत नव्हते. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाणारे पत्रकार याच्या समोर नतमस्तक होते.

अशा संपूर्ण प्रतिकुल परिस्थीतीत कुलदिप नय्यर यांनी जबाबदारी निभावण्याचा निर्णय घेतला. आणीबाणीच्या पहिल्या दिवशीच त्यांची गाडी बाहेर निघू दिली जात नव्हती. त्या गाडीत वर्तमान पत्रांचे गठ्ठे होते. अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं वर्तमान पत्र छापण्याआधी ते पोलिसांसमोर ठेवावं. कोणतही राजकीय अक्षेपार्ह्य लिखाण केलं जाऊ नये अशी तंबी त्यांना देण्यात आली. आदेशांचं उल्लंघन केल्यास तुमच्या वर्तमानपत्रावर बंदी घातली जाईल हे देखील त्यांना सांगण्यात आलं.

याविरोधात कुलदीप नय्यर यांनी वर्तमान पत्रांचे दोन कॉलम रिकामे सोडून छपाईला सुरुवात केली. वर्तमानातील परिस्थीतीची तुलना त्यांनी पाकिस्तानच्या आयुब खानच्या नेतृत्वातील हुकुमशाहीशी करायला सुरुवात केली. यानंतर त्यांना पुन्हा फोन आला. यात सरळ सरळ धमकी देण्यात आली होती. पुन्हा सरकारविरोधी लिहाल तर तुम्हाला अटक केली जाईल.

तिहाड तुरुगांत केली रवानगी

पुढच्या दिवशी त्यांनी १०३ पत्रकारांना एकत्र केलं. आणीबाणीविरोधातलं निवदेन वाचलं. नंतर यावर त्यांनी १०३ पत्रकारांच्या सह्या घेतल्या. राष्ट्रपती भवनाकडं त्यांनी मोर्चा वळवला. हे पत्र राष्ट्रपतींना देण्याचा त्यांचा मानस होता. पण पोलिसांनी वाटेत आडकाठी घातली. राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघालेले नय्यर यांना तिहाड तुरुंगात टाकण्यात आलं. तुरंगात एका संपादकाशी अट्टल गुन्हागाराप्रमाणं व्यवहार करण्यात आला; पण कच खातील ते नायर कसले?

तुरुंगातून परतल्यावरही आक्रमकता ढळू दिली नाही

लवकरच ते तुरुंगातून बाहेर पडले. त्यांना तुरुंगातून मुक्त करताना अट घालण्यात आली होती की ते सरकार विरोधी लिखाण करणार नाहीत. तुरुंगातून त्यांनी थेट ऑफिस गाठलं आणि स्वतःच्या नावानं हवामानाचा आंदाज छापून आणला. त्यांना संपुर्ण जगाला संदेश द्यायचा होता की ते तुरुंगातून बाहेर आलेत आणि सत्तेविरोधात ताठ मानेनं उभे आहेत.

त्यांना करण्यात आलेली अटक इतर पत्रकारांच्या मनात भिती घालण्यासाठी केलेली कारवाई होती. इंदिरांना यात यश मिळालं. कुलदिप नय्यर जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांना भेटायला कोणता पत्रकार आला होता न त्यांच्या पत्नीला. यावरुन पत्रकारांच्या मनात असलेली भिती तुमच्या लक्षात येईल.

१९७७ साली आणीबाणी मागं घेण्यात आली. निवडणूका झाल्या आणि काँग्रेसचा दारून पराभव झाला. इंदिरांना रायबरेलीचा पारंपारिक मतदारसंघही गमवावा लागला. १९८० ला काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. कुलदिप नय्यर यांच्या हस्तक्षेपामुळंच संविधानातील आणीबाणी विषय कलमात सुधारणा करण्यात आली. आज देशात आणीबाणी लागू करण्यासाठी लोकसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांचं समर्थन घेणं गरजेच आहे. मानवी मुल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अशा या लढवय्या पत्रकारानं २२ ऑगस्ट २०१८ ला जगाचा निरोप घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER