जिद्द म्हणजेच शरद पवार! लवकरच राष्ट्रीय राजकारणात दिसणार; संजय राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut - Sharad Pawar

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. ट्विटच्या माध्यमातून या भेटीची माहिती देत त्यांनी मोठे विधान केले आहे. ‘जिद्द म्हणजेच शरद पवार, दुसरे काही नाही, ते लवकरच राष्ट्रीय राजकारणात उतरणार आहेत.’ असे मोठे विधान करून त्यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.

पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. काही दिवस विश्रांती केल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहे. आज संजय राऊत यांनी सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन सदिच्छा भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली. पवार साहेबांची प्रकृती उत्तम असून त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. आम्ही राज्य व देशाबद्दल चर्चा केली. ते पुन्हा राष्ट्रीय राजकारणात उतरणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ‘जिद्द म्हणजेच शरद पवार, दुसरे काही नाही’ असं म्हणत त्यांचं कौतुकही केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button