तुळजाभवानीच्या अंगावरील दागिन्यांची पुन्हा चोरी

तुळजापूर :- तुळजाभवानीच्या मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाली आहे. मौल्यवान माणकांसह, चांदीचे खडाव आणि विविध राजवाड्यांकडून मिळालेली पुरातन नाणी मंदिर संस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हडप केल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी आणि विधिमंडळाकडे दिला आहे. यापूर्वीही चोरीचा प्रकार येथे घडला होता.

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठापैकी तुळजापूरची ओळख आहे. मोठ्या श्रद्धेने राज्यभरातून भक्त तुळजाभवानीच्या दर्शनाला येत असतात. मंदिराचे पुजारी किशोर गंगणे आणि त्यांचे वकील शिरीष कुलकर्णी यांनी मंदिराच्या खजिन्यातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या. अनेक पुरातन नाणी गहाळ असल्याचे
समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी पाच पेट्या असून, यातील काही पेट्यातील दागिने पळवून नेल्याचे दिसून आले आहे. या चोरीच्या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारीआणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस समितीने आपल्या अहवालात केली आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा सरकारचा विचार : निर्मला सीतारामन