ज्वेलरी जुगाड : लग्नात नथ तर पाहिजेच; मास्कवर असली तरी चालेल

Maharashtra Today

कोरोनाच्या(Corona) साथीच्या काळात मास्कमुळे सर्वांचे नाक – तोंड झाकले गेले आहेत. मास्क मोठा असला तर कानही झाकले जातात. यामुळे काहींना जीव गुमरल्याचा त्रास होतो. पण काही महिलांना नाक – कानातले दागिने कोणाला दिसत नाही याचा जास्त त्रास होतो!

इतरवेळी चालून जाते, पण लग्नातही दागिने घालून मिरवायचे नाही हे अतिच ! यावर एका महिलेने अफलातून उपाय शोधला लग्नात ती मास्कवर नथ घालून आली! आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी ‘ज्वेलरी जुगाड’ शीर्षकाने त्या दागिन्यांच्या हौशी महिलेचा फोटो त्यांच्या ट्विटरवर व्हायरल केला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही पुरुषही यात मागे नाहीत. मास्क वापरणे बंधनकारक झाल्यानंतर काही लोकांनी श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी सोन्याचे मास्क बनवले आहेत तर काहींनी त्या मस्कवर हिरेही लावले आहेत! नवरदेव लग्नात सोन्याच्या मास्कची मागणीही करत असतील!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button