लाच स्विकारणारा जमादार अटकेत

Bribery

औरंगाबाद : दाखल गुन्ह््यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी २ हजाराची लाच स्विकारणा-या सहायक पोलिस आयुक्त कार्यालयातील जमादाराला एसीबीने शनिवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई दुपारी छावणीतील सहायक पोलिस आयुक्त कार्यालयात करण्यात आली.

तक्रारदारांच्या नातेवाईकाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह््यात सीआरपीसी कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव फाईल करण्यासाठी जमादार प्रदीप हिरालाला धोटेने ४ हजाराच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी एसीबीचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याकडे तक्रार दिली. एसीबीने शहानिशा केल्यानंतर आज तडजोडीअंती २ हजारांची लाच स्विकारताना जमादार धोटेला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER