जेहान दारुवाला बनला फॉर्म्युला टू रेस जिंकणारा पहिला भारतीय

Jehan Daruvala

जेहान दारुवाला (Jehan Daruvala) हे नाव फारसे ऐकण्यात नसेल पण या नावाच्या माणसाने भारतासाठी खेळांच्या क्षेत्रातील एक नवे दालन खुले केले आहे. मुंबईचा हा 22 वर्षीय मोटार रेसिंगपटू फॉर्म्युला टू रेस (F2 race) जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. मोटार रेसिंगमध्ये ‘फॉर्म्युला वन’ नंतर याच रेसेस अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यात बहारीन येथील साखीर ग्रँड प्रिक्स (Sakhir Grand Prix) स्पर्धेत त्याने रविवारी हे यश मिळवले.

कार्लिन टीमसाठी 34 लॕपच्या या रेसमध्ये तो सर्वात जलद राहिला. त्याच्याच टीमचा युकी सुनोदा दुसऱ्या स्थानी राहिला. त्याने जेहानपेक्षा 3.561 सेकंद जादा वेळ घेतली. तिसऱ्या स्थानी डॕम्स टीमचा डॕन टीक्टम राहिला. तो दारुवालाच्या 3.902 सेकंद मागे होता.

फॉर्म्युला 2 स्पर्धेत भारतीय खेळाडूचे हे पहिलेच यश आहे. याच्याआधी जीपी2 नावाने या रेसेच्या व्हायच्या तेंव्हा करुन चंधोक दोन वेळा विजेता ठरला होता पण एफ 2 मध्ये रेस जिंकणारा जेहान दारुवाला हा पहिलाच भारतीय आहे.

एफ-टू ची वर्ल्ड चॕम्पियनशीप जिंकणारा जर्मनीचा मीक शुमाकर व डॕम्स टीमच्या डॕनियल टिक्कम यांनी त्याला कडवी स्पर्धा दिली. डॕनियल हा पोल पोझीशनला होता आणि दारुवाला ग्रीडमध्ये सुरुवातीला दुसऱ्या स्थानी होता. मात्र या दोघांवरही सुरुवातीला मिक शुमाकरने आघाडी घेतली. पण पुढे डिक्टम आघाडीवर आला आणि दारुवाला दुसऱ्या स्थानी आला. शुमाकरने त्याला पुन्हा मागे टाकले. मात्र जेहानने जोर लावून पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानी आला. त्यानंतर पहिल्या स्थानासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले पण टिक्टम त्याला आघाडीवर येऊ देत नव्हता.

शेवटचे 10 लॕप बाकी असताना जेहान आघाडीवर आला आणि आघाडी कायम राखत त्याने अंतिम रेषा सर्वप्रथम पार केली.

मोटारस्पोर्ट भारतात बऱ्याच लोकांना आवडते. माझे चाहतेही बरेच आहेत त्यामुळे स्वतःसाठी आणि देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्याचे माझे उद्दीष्ट होते. युरोपसारख्या मोटारस्पोर्टच्या सुविधा आपल्याकडे नसल्या तरी मेहानतीने त्या कमतरतांवर मात करत यश मिळू शकते हे मला दाखवून द्यायचे होते असे जेहानने या यशानंतर म्हटले आहे. गेल्यावर्षी फॉर्म्युला थ्री रेसेसमध्ये जेहान तिसऱ्या स्थानी होता.

फाॕर्म्युला टूची वर्ल्ड चॕम्पियनशीप मिक शुमाकरने जिंकली. मिक हा सातवेळेचा फॉर्म्युला वन विश्वविजेता मायकेल शुमाकर याचा मुलगा आहे. मिक हा या शेवटच्या रेसमध्ये 18 व्या स्थानी राहिला तरी 14 गुणांच्या आघाडीने त्याने वर्ल्ड चॕम्पियनशीप जिंकली. मिक शुमाकर हा पुढच्या वर्षी फॉर्म्युला वनमध्ये हास फेरारी टीमसाठी खेळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER