नंदूरबारमध्ये भीषण अपघात : मजुरांची जीप ५०० फूट दरीत कोसळली, सहा ठार

Accident

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळ या अतिदुर्गम भागात भीषण अपघात घडला आहे. मंजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तोरणमाळ-खडकी रस्त्यावर ही घटना घडली. गावातील काही मजुरांना कामाच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी ही जीप नियमितपणे ये-जा करत होती. आज सकाळी तोरणमाळ-खडकी रस्त्यावर अचानक या जीपला अपघात झाला.

अपघातानंतर जीप ५०० फूट खोल दरी कोसळली. या भीषण अपघातात जीपचा फक्त सांगडाच उरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली. दरीत मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर काही जणांचे मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी मजुरांना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडी खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांचा शोध सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER