मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, जयसिंगराव गायकवाड यांचा राजीनामा

Jaisingrao Gaikwad

औरंगाबाद :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad) यांनी भाजपला (BJP) जबर धक्का दिला आहे. त्यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजपमध्ये कुचंबणा होत असल्याचे कारण पुढे करत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

मराठवाडा (Marathwada) पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता जयसिंगराव यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेणार असले तरी त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे. जयसिंगराव गायकवाड मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्र आणि राज्यात काम केले आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपला त्यांच्या जाण्याची किंमत मोजावी लागू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER