‘जयंतराव, लाळघोटेपणाची हद्द झाली !’ भाजप नेत्याची टीका

Atul Bhatkhalkar & Jayant Patil

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त काल जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या होत्या. हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम-सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे.

आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा आहेत- असे ट्विट जयंत पाटील यांनी केले होते .पाटील यांच्या या ट्विटनंतर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. जयंतराव, लाळघोटेपणाची हद्द झाली, आपल्या नेत्याची स्तुती करताना राष्ट्रपुरुषांचा अपमान होणार नाही एवढी तरी काळजी घ्या… असे ट्विट त्यांनी केले  आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER