सांगलीत वाढणारी रुग्णसंख्या हे जयंतरावांचे अपयश : दीपक शिंदे

Deepak Shinde

सांगली : सांगली जिल्ह्यात वाढणारी कोरोनाचे रुग्ण संख्या हे जिल्हा प्रशासनाचे नव्हे तर पालकमंत्री जयंत पाटील यांचे अपयश आहे. कोरोना बाधित रुग्णांचा होत असलेले मृत्यूला प्रशासनाचे नव्हे तर पालकमंत्री जयंत पाटील जबाबदार आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.

ते म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय उपचाराअभावी व व्हेंटिलेटर मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. कोरोना रुग्ण व मृत्यू प्रमाण हे महाराष्ट्रात अग्रक्रम घेत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. याबाबतचे नियोजन चुकले आहे. ते प्रशासनामुळे नव्हे तर पालकमंत्री जयंत पाटील यांच्यामुळे नियोजन चुकले आहे.

त्यामुळे जयंत पाटील यांचे हे अपयश आहे. डॉक्टरांच्या उपचाराचे ऑडिट करण्याची गरज नाही. मात्र या रोगावरील उपचाराबाबत डॉक्टरांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्य जिल्ह्यातील डॉक्टर करीत असलेल्या उपचाराची माहिती येथील डॉक्टरानी घेतली पाहिजे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षा पार्टीतर्फे ग्रामीण भागात कोरोनावर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER