
मुंबई : ‘मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते !’ राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जयंतराव पाटील (jayant patil) यांच्या या विधानाने आज राजकारणात चर्चांना ऊत आला. यावर, राष्ट्रवादीत पवारांच्या कुटुंबालाच प्राधान्य आहे, असे सूचित करताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी टोमणा मारला – मुख्यमंत्री होण्यासाठी जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल! मुनगंटीवार म्हणालेत, जयंत पाटलांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असे मला वाटत नाही. पवारसाहेबांचेच कुटुंब फार मोठे आहे. या कुटुंबाला संधी देता देता जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावे लागेल.
जयंत पाटील …
दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे मी म्हणालो होतो, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला