जयंत पाटलांच्या वक्तव्याने पंढरपूर पोटनिवडणुकीत नवे वळण ; देवेंद्र फडणवीस उमेदवार मागे घेणार?

Devendra Fadnavis - Jayant Patil

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना रिंगणात उतरवलं आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) दोघेही आज पंढरपुरात उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा तनपुरे मठात मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्याला संबोधित केलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण ३ तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असे पाटील म्हणाले .

महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : ‘काळजी करु नका, पंढरपूरचा करेक्ट कार्यक्रम आम्हीच करु, जयंत पाटलांचा पवारांना शब्द

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button