इस्लामपुरात राष्ट्रवादी नेत्याच्या शोधात! जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक यांना मिळू शकते संधी

मुंबई : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीला (Islampur municipal elections) आता फक्त सहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक उरला आहे . तरीही इस्लामपूर मतदारसंघातच पक्षाला एकमुखी नेतृत्व मिळत नसल्याचं चित्र आहे. मात्र आगामी काळात पाटील यांचे मोठे सुपुत्र प्रतीक पाटील (Prateek Jayant Patil) यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १९८५ पासून सलग ३५ वर्षे विजय पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर राष्ट्रवादीचे नेतृत्व होते. मात्र २०१७ मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीत निशिकांत पाटील यांनी विजय पाटील यांचा पराभव केला होता.

पराभवानंतर विजय पाटील राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले. तर विजय पाटील यांच्या निधनानंतर आजपर्यंत राष्ट्रवादीला पालिकेत नेतृत्व मिळालेले नाही.प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात फेब्रुवारी महिन्यात सांगलीत मोर्चा काढण्यात आला होता. प्रतीक जयंत पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चात सहभागी झाले होते. दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. प्रतीक पाटील गेल्या काही काळापासून स्थानिक राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत.

दरम्यान जयंत पाटील जवळपास गेल्या तीन दशकांपासून राष्ट्रवादीतर्फे इस्लामपूर मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. सध्या त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आहे. तर ठाकरे सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्रालय सांभाळत आहेत. याआधी त्यांनी ग्रामविकास, अर्थ आणि गृह अशी वजनदार खातीही सांभाळली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button