जयंत पाटलांचा टोमणा, दोन वेळा निवडून दिल्याबद्दल हे आहे केंद्राचे ‘रिटर्न गिफ्ट’ …

jayant Patil - Maharastra today

मुंबई : केंद्रात दोन वेळा निवडून दिल्याबद्दल केंद्राने जनतेला – महागाई, इंधन दरवाढ आणि मायनसमधील जीडीपी हे ‘रिटर्न गिफ्ट’ दिले आहे, असा टोमणा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला मारला. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणालेत, २०२० – २१ या आर्थिक वर्षांतील भारताचा विकास दर उणे (-) ७. ३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्रसरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे,

४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी

सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२० – २१ या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७. ३ टक्के नोंदवला गेला आहे. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५. २ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे ७. ३ टक्क्यांवर घसरला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

केंद्रीय अर्थमंत्र्याचीही कबुली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचं मान्य केले आहे. देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन पॅकेजची मागणी केली जात आहे. सरकार अशा अनेक योजना यापूर्वीच चालवित आहे, त्या पूर्ण अंमलात आणल्या गेल्या तर सर्व समस्या सुटू शकतात, असे सीतारामन म्हणाल्या.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button