एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते! मंत्री राठोड प्रकरणी जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil - Pooja Chavan - Sanjay Rathod

जळगाव : टिक टॉक स्टार पुजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणी भाजप आता आक्रमक झाला आहे. एवढेच काय तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे (NCP) मोठे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं या प्रकरणात थेट नाव घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. पाठीमागे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते, असं जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती मला काहीच माहिती नाही मी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत आहे. मंत्रीमहोदयांचं थेट नाव घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही.

पाठीमागच्या घटना पाहता लक्षात येईल एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते. त्यामुळे थोडंसं संयमाने घेण्याची गरज आहे. पोलिस याबाबतचा सविस्तर तपास करतील, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER