जयंत पाटील यांचे पक्षासाठीचे कष्ट फळाला येणार! लवकरच राज्यव्यापी दौ-यावर

Jayant Patil

मुंबई :  राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) राज्यव्यापी दौ-यावर जाणार आहेत. पक्षसंघटन आणि पक्ष मजबुतीसाठी ते दौरा करणार आहेत. गडचिरोलीतल्या अहेरीपासून ते 28 जानेवारीपासून दौऱ्याला सुरूवात करणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री बणण्याची इच्छा असल्याच्या विधानावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जयंत पाटील म्हणाले, झ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या वक्तव्यात फेरफार करुन त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

त्याउलट तेव्हाही आपण पक्षसंघटना, पक्षमजबुतीकरणाची गरज असल्याचे बोलल्याचे ते म्हणाले. काय म्हमाले होते जयंत पाटील – मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. मला हे माहितीय की आमच्याकडे 54 आमदार आहे. 54 आमदारांचा कसा मुख्यमंत्री होणार? त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पक्षसंघटना, पक्षमजबुती यासाठी पाटील आता राज्यव्यापी दौ-यावर जाणार आहेत. गडचिरोलीच्या अहेरीपासून सुरू होणा-या दौ-याचा 13 तारखेला नंदूरबारमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा दौरा असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी हा दौरा नियोजित केला आहे.

नुकत्याच हाती आलेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालात राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी वर्चस्व गाजवले आहे. आता स्थानिक स्वराज्य संथ्यांमध्येही आपले स्थान भक्कम करण्याच्या दृष्टीने जयंत पाटील यांनी पक्षसंघटना आणि पक्षमजबुतीसाठी पुन्हा पुढाकार घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं वेगळं; पण करणार कोण?- शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER