जयंत पाटील यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा, त्यात गैर काय? सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

Jayant Patil - Supriya Sule

राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोन दिवसांपूर्वी (बुधावार) मनातली मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. जाहीरपणाने मुख्यमंत्रिपदाविषयी इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जयंत पाटलांना शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

राजकीय जीवनात काम करत असताना इच्छा-आकांक्षा असतात. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला आहे. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तसंच त्यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत होत्या. भाजपने (BJP) फटकेबाजी करत आता फक्त रोहित पवारांनाच (Rohit Pawar) मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडायचे राहिले, अशा शब्दात निशाणा साधला. तर अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेला पाठिंबा दिला.

ही बातमी पण वाचा : ‘जयंत पाटलांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा, त्यांच्या इच्छेला माझ्या शुभेच्छा’ – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER