‘जयंत पाटलांचा दावा फुसका, पोटनिवडणुकीत भाजपचाच उमेदवार जिंकणार’ – प्रवीण दरेकर

Jayant Patil - Parvin darekar - Maharastra Today

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवार देणार नाही असा शब्द दिला होता. आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वाट बघू. फडणवीस यांच्यावर आताच अविश्वास दाखवणं योग्य ठरणार नाही. परिचारक आणि आवताडे गटातील अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या संपर्कात आयत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार आहे, असा दावा पाटील यांनी केला होता. त्यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी जयंत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पंढरपूरच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे. देवेंद्र फडणँवीस यांनी उमेदवार देणार नाही असा कुठलाही शब्द दिल्याचं मला माहिती नाही. असं असतं तर या निवडणुकीत भाजपनं उमेदवार दिलाच नसता. जयंत पाटील यांचं विधान निराधार आणि तथ्यहीन आहे, असा दावा दरेकर यांनी केला. भाजपने उमेदवार दिला आहे आणि तो निश्चितपणे जिंकणार आहे. म्हणूनच वेगवेगळी वक्तव्य करुन दिशाभूल करण्याचं काम सुरु असल्याची टीका दरेकर यांनी जयंत पाटलांवर केली.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी सत्तेत आली आहे, तेव्हापासून भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही, असा शब्द दिला होता. आपण तीन तारखेपर्यंत वाट बघू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य ठरणार नाही, असं जयंत पाटील आज म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button