कोरोनामुळे जयंतराव पाटील ट्रोल

Jayant Patil troll due to corona crises

सांगली : सांगलीतील (Sangli) वाढलेल्या मृत्यूदराचे क्रेडिट पालकमंत्र्यांचेच असल्याचे मेसेज सोशल मीडियात (social media) व्हायरल होत आहेत.

सांगलीत करोना रुग्णांचा (corona patients) वाढता मृत्यूदर आरोग्य यंत्रणा आणि पालकमंत्र्यांचे अपयश स्पष्ट करणारा आहे. कठीण काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गतिमान करण्याऐवजी पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) मुंबईत जाऊन बसले आहेत. पूरबाधित गावांना बोटी देण्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या पालकमंत्र्यांनी आता जिल्ह्यातील वाढत्या मृत्यूदराचेही क्रेडिट घ्यावे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत.

गेल्या महिन्यापासून सांगलीत करोना संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. रोज सरासरी चारशे ते पाचशे रुग्णांची भर पडत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ११ हजार ३९६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत ४६५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेशा आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुग्णांची फरफट सुरू आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने गंभीर रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर वणवण करूनही रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. सध्या सांगलीचा मृत्यूदर सर्वाधिक असूनही सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी परिस्थिती गांभीर्याने घेतली नसल्याची टीका नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यानंतर सोशल मीडियातूनही पालकमंत्र्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER