सांगलीच्या जिल्हापरिषदेतही जयंत पाटील भाजपला अस्मान दाखवणार ?

BJP - Jayant Patil

सांगली :  सांगली महानगर पालिकेत (Sangli Zilla Parishad) भाजपची सत्ता घालवल्यानंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपला सत्ता गमवावी लागणार की काय असे प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) केले जात आहेत.

सांगली महापालिकेत महापौर निवडीवेळी नगरसेवक फुटल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) सांगलीच्या जिल्हा परिषदेतही भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती बदलासाठी भाजपमधील मोठा गट आग्रही आहे. त्याचाच फायदा उचलण्याची रणनीती राष्ट्रवादीकडून तयार केली जात असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती बदलासाठी भाजपमधील 24 पैकी 17 सदस्यांनी अनुकुलता दाखवली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांची भेट घेऊन तशी

मागणीही करण्यात आली आहे. परंतू स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपची धास्ती वाढली आहे. मिरज पंचायत समितीत उपसभापती निवडीत भाजपला झटका बसला आहे. कॉंग्रेसने भाजपचे दोन सदस्य फोडले. तर महापालिकेत महापौर निवडीत भाजपचे सात नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसला. आता जिल्हा परिषदेतही असेच झाल्यास पक्षावर नामुष्की ओढवू शकते. जिल्हा परिषदेत अविश्‍वास ठराव आणायचा असल्यास 45 सदस्यांची गरज भासेल. जिल्हा परिषदेत 59 सदस्य असून महिला अध्यक्ष असल्याने दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. विरोधकांकडील संख्याबळ पाहता भाजपमधील किमान १५ सदस्य फुटण्याची गरज आहे.

सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. मात्र, भाजपकडे स्पष्ट बहुमत नसून इतरांच्या कुबड्यांचा आधार घेण्यात आला आहे. महापालिकेत धक्का बसल्याने जिल्हा परिषदेत बदल

करण्याचा थेट विचारही आता नेते करायला तयार नाहीत. पण येथील एक मोठा गट बदलासाठी आग्रही आहे. बदल न केल्यास अविश्‍वास ठरावाचा प्रयोग केला जाण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेनंतर जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे.

ही बातमी पण वाचा : सांगलीतील भाजपच्या गद्दार नगरसेवकांवर होणार कारवाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER