अर्थमंत्र्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीवर प्रकाश टाकायला हवा; जयंत पाटलांनी व्यक्त केले मत

मुंबई : निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर (petrol-diesel price hike) नियंत्रणात ठेवतात आणि निवडणुका गेल्या की लगेचच दरवाढ गगनाला भिडतात. हेच काय वित्त-नियोजन? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला. आधीच देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोरोना रुग्णांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचबरोबर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९२.०५ रुपये तर डिझेलची किंमत ८२.६१ रुपये प्रतिलीटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरूच आहे. परभणीत देशातील सर्वांत महाग पेट्रोल १००.७५ तर डिझेल ९०.६८ रुपये दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये तर डिझेलचे ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

“केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवल्या जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच आहे. हे काय नियोजन आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा.” असे मत जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button