लसीकरणाचा उत्सव नक्कीच करू, पण आधी लस तर द्या; जयंत पाटलांचा खोचक टोला

मुंबई :- राज्यात कोरोना लसीचा (Coronavirus-Vaccine) तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रे  बंद करावी लागली आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी उपलब्ध आहेत. त्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

लस वाटप करणे केंद्र सरकारच्या हातात आहे. मात्र केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश ठरल्याचं दिसून येत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कालच देशात चार दिवस लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पण लस उत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध असणे गरजेचे आहे. आम्ही टीका उत्सव नक्कीच करू. पण आधी लस उपलब्ध करून द्या. जर ही लस नसेल तर लस उत्सवाची वेळ बदला, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, तिथे अधिकच्या संख्येने लस द्यायला हवी. महाराष्ट्राची मागणी ४० ते ५० लाख इतकी होती. मात्र केंद्राकडून फक्त १७.५  लाख लस उपलब्ध झाल्या. या लसी लवकर संपतील.

आजही बीकेसी लसीकरण केंद्र लस नसल्याने बंद करण्यात आले. तिथे लोक लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. पण लस उपलब्ध नसेल तर कसं होणार, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. लस वाटप करणे हे केंद्राच्या अधिकारात आहे. केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी  ठरल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी जे सांगतील ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितलं, आम्ही ते केलं. त्यावर टीका केली नाही. पण आता देशात कोरोना लसीचा फक्त पुरवठा झाला पाहिजे. आता आम्ही टीका उत्सवही करू. पण त्यासाठी लस द्या. ती नसेल तर लस उत्सव वेळ बदला, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘लस आहे, पण देण्याची ऑर्डर नाही, मुख्यमंत्र्यांनी अपयश झाकण्यासाठी जनतेला वेठीला धरलंय : अतुल भातखळकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button