फडणवीसांनी बोलण्यापेक्षा लसीची मागणी करायला हवी होती; जयंत पाटलांचा टोला

मुंबई : “महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे. पण दुर्देवाने लसी कमी पडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लसींचा साठा आहे हे दाखवावे. आम्ही आमच्याच राज्यांच्या लोकांना कसे घाबरवू? महाराष्ट्रासारखे लसीकरण कोणीही करू शकत नाही. लसी कमी पडत असल्यामुळे आम्ही लसीची मागणी वारंवार करत आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी दिल्लीच्या बाजूने न बोलता महाराष्ट्राच्या बाजूने बोलावे. त्यांनी लसीची मागणी केली असती, तर बरे झाले असते.” असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात अक्षरक्ष: कोरोनाचा स्फोट होताना दिसत आहे. यामुळे काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ‘सांगली जिल्ह्यासाठी आम्हाला २ लाख ६४ हजार लस मिळाल्या होत्या. आता फक्त ४ हजार लसी शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव जास्तच आहे.

गुजरातची संख्या ६.५ कोटी तर महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी इतकी आहे. गुजरातमध्ये कोरोनाबाधित कमी आहेत. महाराष्ट्रात लसी हवी आहेत, आरोग्य यंत्रणा व्यवस्थित आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचे असून महाराष्ट्राला लवकरात-लवकर लसी देण्यात यावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button