भाजपाच्या नेत्यांना स्वप्नं पडतात की ‘ऑपरेशन लोटस’ करु ; जयंत पाटलांचा टोला

Fadnavis-Jayant Patil

मुंबई :- भाजपाच्या काही नेत्यांना स्वप्नं पडतात की ऑपरेशन लोटस करु, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांना अमिषं दाखवून राजीनामा द्यायला लावायचे आणि सरकारला धोका निर्माण करायचा, असं भाजपाच्या नेत्यांना वाटतं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

तसेच स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जरी राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवायची ठरवले, तरी महाविकास आघाडी त्यांना पराभूत करेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यावर महाराष्ट्राच चित्र कसं असेल, हे या निवडणुकीत दिसून आले आहे, असं मतही पाटील यांनी व्यक्त केले .

पदवीधर निवडणुकांचा आज निकाल लागला यामध्ये भाजपाला मोठा बसल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद (Aurangabad) या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधाना जयंत पाटील यांनी विजयाबद्दल आनंद व्यक्त करतानाच भाजपाचाही समाचार घेतला.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीमुळे राजकीय समीकरणं बदललं, भाजप ऑपरेशन लोटस बारगळणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER