सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्याचे उदाहरण म्हणजे पडळकर : जयंत पाटील

Jayant Patil-Gopichand Padalkar

सांगली : सत्ता गेल्यानंतर भाजप (BJP) अस्वस्थ झालेले आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेले आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरुन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. पवार जातीयवादी आहेत. त्यांच्या हातून अहिल्याबाईच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये, अशी भूमिका घेत पडळकरांनी पवारांवर शाब्दिक हल्ले केले. याच सगळ्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांनी पडळकरांचे कान टोचले आहे .

सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेलं आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फस्ट्रेशन आले आहे हे यातून स्पष्ट होते, असंही ते म्हणाले.

पडळकरांचं बोलणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही. ते नेहमी बेताल वक्तव्य करत असतात. पडळकरांचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती, अशा शेलक्या शब्दात जयंत पाटील यांनी पडळकरांवर हल्ला चढवला. सत्ता मिळविण्यासाठी एन-केन मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका पाटील यांनी केली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER