जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी : सदाभाऊ खोत

Sadabhau khot - Jayant Patil - Maharastra Today
Sadabhau khot - Jayant Patil - Maharastra Today

मुंबई :- पंढरपूर -मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलीच रंगात आली आहे. भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी मोठ्या तयारीने कामाला लागले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. आज (11मार्च) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली. भर पावसात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सभा दणाणून सोडली आहे. यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला .

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा 35 गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांच्या प्रचारासाठी खोत उपस्थित होते.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप विकासाच्या मुद्द्यांवरुन लढत आहे. अजित पावर (Ajit Pawar) यांना पोटनिवडणुकीत काही देणेघेणे नाही. त्यांची नजर विठ्ठल सहकारी कारखान्यावर आहे. पवार घराणे राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढत आहे. अजित पवार हे गल्लोगल्ली फिरत आहेत, अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button