वळसे पाटलांनी पदभार स्वीकारताच आठवणी ताज्या ; जुना फोटो शेअर करत जयंत पाटील म्हणाले…

jayant Patil - Maharastra today
jayant Patil - Maharastra today

मुंबई : दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अनेक स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीसुद्धा आपला जुना काळ आठवत वळसे-पाटील यांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले आहे. त्यांनी वळसे-पाटील यांना कडक शिस्तीचा प्रशासक म्हटले आहे.

माझे जुने मित्र दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता गृहमंत्रिपदाच्या जबाबदारीसाठीही मनापासून शुभेच्छा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button