जयंत पाटील म्हणतात, आधी जीव महत्त्वाचा; सांगलीत आठवडाभर संपूर्ण लॉकडाऊन जाहीर

jayant Patil - Maharastra today

सांगली :- सांगलीत कोरोना संसर्ग (Corona infection) वाढल्याने आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या ५ मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे. आपल्या सर्वांचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

लॉकडाऊनबाबतची घोषणा जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट माध्यमातून दिली आहे. सांगलीतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे जयंत पाटील म्हणाले. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून आठवडाभराचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहचली आहे. यात काल ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटलांचे आवाहन

जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळत आहे, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही तुटवडा जाणवत आहे. म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे.  त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button