जयंत पाटील म्हणतात ‘दिल्ली अभी दूर नही’ : आपचे दोन आमदार राष्ट्रवादीच्या गळाला

Jayant Patil

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नाराज आमदार फतेह सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कमांडो सुरिंदर सिंह यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जयंत पाटलांनी ‘दिल्ली अभी दूर नहीं…’, असे ट्विट करत भविष्यात दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत फतेहसिंह आणि सुरिंदरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक विचार असून या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण पक्षाशी जोडले जात आहे. हा वटवृक्ष आणखी बहरो!, असे म्हणत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांचे स्वागत केले आहे.